टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच

On: May 12, 2026 11:12 AM
Follow Us:

करमाळयातील नूतन सह दुय्यम निबंधक कार्यालयात उद्घघाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

सोलापूर: जिल्ह्यातील करमाळा (Karmala) येथे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी चक्क शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांच्याहस्ते कार्यालयाचे उद्घाटन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, बावनकुळे यांनी आग्रह करत त्यांना रेबिन कापायला लावली, तर त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुनही त्यांनी फोटो शेअर केले आहेत

करमाळयातील नूतन सह दुय्यम निबंधक कार्यालयात उद्घघाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चक्क शरद पवार गटाचे आमदारनारायण पाटील यांना कार्यालयाचे उद्घाटन करायला लावले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , रश्मी बागल, गणेश चिवटे उपस्थित होते. तसेच, करमाळ्यात प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल बांधकामासाठी आवश्यक वाळूचे वाटप करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना घरकुल योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळावा, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी महसूलमंत्र्‍यांनी म्हटले.

राज्यातील सर्वच खाती महत्त्वाची असली तरी अनादी कालापासून दोन विभाग कायमच जास्त महत्त्वाचे राहिले आहे. एक गृह विभाग जो तुमच्या जीविताचे रक्षण करतो आणि दुसरा महसूल विभाग जो तुमच्या मालमत्तेचे रक्षण करतो. मंत्रिमंडळातील इतर विभाग ही महत्त्वाचे पण त्यातल्या त्यात हे दोन विभाग सर्वात महत्त्वाचे असतात अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीत भाजपकडे सर्वात महत्त्वाचे विभाग असल्याचे संकेत बावनकुळे यांनी यावेळी दिले. मात्र, याचा चुकीचा अर्थ इतरांनी घेऊ नये अशी पुष्टी ही महसूलमंत्र्यांनी जोडत महायुतीतील सहकाऱ्यांसाठी आपल्या वक्तव्याची सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला.

प्रांत, तहसीलदार यांची कामे महसूलमंत्र्‍यांना करावी लागतात

मी करमाळ्यात निवेदन स्वीकारणार सांगितल्यावर जवळपास 45 साध्या साध्या कामाची निवेदने मला मिळाली. जी काम प्रांत, तहसीलदार तलाठी करू शकतो, अशी काम करायला महसूल मंत्र्याला यावं लागतं हे दुर्दैव असल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक पॅटर्न स्वीकारून प्रत्येक गावात महसुली पथक पाठवून लोकांची कामे करावीत, असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी करमाळ्यात जिल्हाधिकाऱ्यांना दिला. करमाळा दौऱ्यावर लोकांनी त्यांना भेटून निवेदन दिली. आलेल्या निवेदनांचा तात्काळ निपटारा बावनकुळे यांनी केला. यावेळी अनेक छोट्या छोट्या कामांची निवेदने आपण स्वीकारून कामे केली असल्याने स्थानिक महसूल प्रशासनावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेत आणखी 17 आमदार वाढणार; ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरसाठी निवडणुका, पाहा A टू Z माहिती

Sunetra Pawar On NCP National Executive List: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल, तटकरेंची नावं गायब, पत्र व्हायरल होताच सुनेत्रा पवारांकडून स्पष्टीकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now