टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sunetra Pawar On NCP National Executive List: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल, तटकरेंची नावं गायब, पत्र व्हायरल होताच सुनेत्रा पवारांकडून स्पष्टीकरण

Sunetra Pawar On Nationalist Congress Party National Executive List: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यांचे काम यासंदर्भात सविस्तर यादी 29 एप्रिलला दिल्याचे पत्र प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

Sunetra Pawar On Nationalist Congress Party National Executive List: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन (NCP Ajit Pawar Group) मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारणीच्या यादीत प्रफुल पटेल (Parful Patel), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे नाव नसल्याचे अनेकांच्या भुवया उंचवल्या असून चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत एक तांत्रिक चूक झाल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत स्पष्ट केलं.

नेमकं काय घडलं? (Nationalist Congress Party National Executive List)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यांचे काम यासंदर्भात सविस्तर यादी 29 एप्रिलला दिल्याचे पत्र प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या सोबत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांचे सुद्धा नाव आहे. मात्र यामध्ये प्रफुल पटेल सुनील तटकरे या नेत्यांची नावे राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये वगळण्यात आल्याचे या यादीमध्ये दिसत आहे. परंतु या यादीमध्ये तांत्रिक आणि क्लेरिकल चुका असून या दुरुस्त केल्या जातील असं सुनेत्रा पवारांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

Sunetra Pawar On NCP National Executive List: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल, तटकरेंची नावं गायब, पत्र व्हायरल होताच यादीत तांत्रिक चूक असल्याचं सुनेत्रा पवारांकडून स्पष्टीकरण

सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणाल्या? (Sunetra Pawar On Nationalist Congress Party National Executive List:)

माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांच्या यादीत एक तांत्रिक असून, ती लवकरच दुरुस्त केली जाईल, असं सुनेत्रा पवार एक्सवर पोस्ट करत म्हणाल्या.

 

बारामतीत 2029 मध्ये पवार विरूद्ध पवार लढतीचे संकेत- (Baramati Pawar vs Pawar)

अजित पवारांच्या मृत्यूनंतर बारामती मतदारसंघाचा वारसदार कोण अशा चर्चा रंगल्या आहेत. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरूद्ध पवार होणार नाही असं सुप्रिया सुळेंसह कुटुंबातले सदस्य सांगत आहेत. मात्र दुसरीकडे पवार कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीचे दौरे आणि परस्परविरोधी वक्तव्य पवार विरूद्ध पवार लढतीचेच संकेत देत आहेत. कुटुंब म्हणून पवार एकत्र असले तरी राजकीय विरोध अजूनही कायम आहे. त्यातच आता युगेंद्र पवार आणि जय पवार हे बारामती अक्षरशः पिंजून काढतायत. राष्ट्रलादी शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार मतदारसंघात रोज दौरे करत आहेत. गाठीभेटी घेत आहेत. समस्या सोडवण्यावर भर देत आहेत. जो व्यक्ती लोकांचे प्रश्न सोडवेल त्याला बारामतीकर साथ देतील असं युगेंद्र पवारांनी म्हटलंय. त्यामुळे 2024 प्रमाणेच 2029लाही युगेंद्र रिंगणात उतरणार यात शंकाच नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनीही बारामती मतदारसंघात अधिकाधीक वेळ देण्यास सुरूवात केलीय. लोकांच्या सुखःदुखात ते पोहोचतात, नुकसाग्रस्त भागाची पाहणी करतात. जनता दरबार घेऊन प्रश्नही सोडवण्यावर भर देतात. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं ते सांगत आहेत. तर कर्जत जामखेडमधून राजकारणात जम बसवलेल्या रोहित पवारांचीही बारामतीत एन्ट्री घेण्याची सुप्त इच्छा असल्याचं बोललं जातंय.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Monsoon Update El Nino: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला, पण तिकडे समुद्रात एल निनो ॲक्टिव्ह झाला, पावसाबाबत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

Raj Thackrey : मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुकांच्या पलीकडे जाऊन… राज ठाकरे यांचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आवाहन काय? पोस्ट चर्चेत

Abhijit Dipke : अमेरिकेतून अभिजीत दीपके भारतात; स्वागतासाठी जनसागर लोटला; पोलिसांचा पहारा अन्…

Instagram Plus लॉन्च, आता इन्स्टाग्राम वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार का?

IMD Monsoon Update : गुड न्यूज! आता वेटिंग नाहीच, अलर्ट आलाच… कधीही दणादण कोसळणार, मान्सूनची मोठी अपडेट लगेच करा चेक

Gold Price Today : सराफा बाजारातून ग्राहकांसाठी गुड न्यूज ! सोन्याचे भाव दाणकन आपटले… आजचे 10 ग्रॅमचे दर किती ?