टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला-पंढरपूर रोडवर भीषण अपघात; मावशीला आणण्यासाठी निघालेल्या 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी

Follow Us:

सांगोला – मावशीला आणण्यासाठी जात असताना दोन दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुणाचा डोक्याला गंभीर मार लागून मृत्यू झाला तर ७५ वर्षीय वृद्ध गंभीर झाला जखमीवर सांगोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात रविवारी सकाळी ११ च्या सुमारास सांगोला- पंढरपूर रोडवरील सुरवसे वस्ती जवळ घडला.

अभिजीत प्रकाश बाबर ( वय -२० ,रा तिसंगी ता पंढरपूर ) असे मृत तरुणाचे नाव आहे तर इसीबलाल पैगंबर मुजावर ( वय -७५ रा मांजरी ता सांगोला ) असे जखमीचे नाव आहे. याबाबत , सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ माळी यांनी खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे..
तिसंगी येथील मृत तरुण अभिजीत बाबर हा एम एच १३ -ईएम-२२४४ या दुचाकीवरून तिसंगी येथून मेथवडे फाटा मार्गे बामणी ता. सांगोला येथील मावशीला आणण्यासाठी निघाला होता तर मांजरी येथील जखमी इसीबलाल मुजावर हे एम एच -४५ -झेड-६४७४ दुचाकी वरून मांजरी गावातून पंढरपूर रोडने सुरवसे वस्ती नजीक शेतातील घराकडे निघाले होते सकाळी ११ च्या सुमारास मुजावर घराकडे वळत असताना मेथवडे फाट्याकडून येणाऱ्या दुचाकीची त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातात अभिजित बाबर याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यास प्रदीपकुमार इंगोले( रा.वाढेगाव ता सांगोला) यांनी उपचाराकरता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला तपास पोलीस हवालदार बजरंग बोराटे करीत आहेत.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now