टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

महाबळेश्वरच्या घाटात 900 फूट दरीत दाम्पत्य कोसळल; पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत, दुसऱ्यादिवशीही चालली शोध मोहिम

On: April 24, 2026 6:04 PM
Follow Us:

आंबेनळी घाट परिसरात रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत मोटारसायकल आढळल्यानंतर प्रशासन आणि स्थानिक पथकांकडून तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली.

सातारा : जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात पुन्हा एकदा दु:खद घटना घडली असून आंबेनळी घाटात (the valley) सुमारे 900 फूट खोल दरीत कोसळून दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीत ही दुर्घटना घडली. अंधार, मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यांमुळे काल मध्यरात्री बचावकार्य थांबवावे लागले होते. मात्र, आज सकाळपासून पुन्हा एकदा दाम्पत्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये, दोघांचेही मृतदेह आढळून आले असून पोलीस आणि स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने वरती काढण्यात आले.

आंबेनळी घाट परिसरात रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत मोटारसायकल आढळल्यानंतर प्रशासन आणि स्थानिक पथकांकडून तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली. दोरांच्या सहाय्याने बचाव पथकाने जीवाची पर्वा न करता सुमारे 900 फूट खोल दरीत उतरुन शोधकार्य केले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पुरुषाचा मृतदेह सापडला, तर त्यानंतर सुमारे 150 फूट खाली महिलेचा मृतदेह देखील आढळून आला. या अपघातात मृत्यू पावलेल्यांची ओळख मोहन चव्हाण आणि जयश्री चव्हाण अशी झाली असून या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, रात्री अचानक पावसाचा जोर वाढल्याने आणि धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने बचावकार्य तात्पुरते थांबवावे लागले होते. आज सकाळी बचाव पथके, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने पुन्हा संयुक्तपणे मोहीम सुरू केली. महिलेचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. या संपूर्ण घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून बचाव पथकाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला मोटारसायकल उभी करुन दाम्पत्य खोल दरीत पडल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात असून हा अपघात आहे की आणखी काही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा

देशाच्या राजकारणात मोठी खळबळ! आप पक्षात महाभूकंप, राघव चड्ढासह 7 खासदार भाजपात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now