टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sharad Pawar Hospitalised : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, बारामती दौरा अचानक रद्द, नेमकं काय झालं? कशी आहे प्रकृती?

Sharad Pawar Hospitalised: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Sharad Pawar Hospitalised : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, बारामती दौरा अचानक रद्द, नेमकं काय झालं? कशी आहे प्रकृती?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. रुग्णालयात दाखल असल्यामुळे शरद पवार आज बारामती दौऱ्यावर जाऊ शकणार नाहीत.

नेमकं काय झालं?

शरद पवार दिल्लीहून दोन दिवसांपूर्वी आले आणि त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. प्रकृती बिघडल्यामुळे उपचारासाठी त्यांना अॅडमिट करण्यात आले. सोमवारी डिस्चार्ज मिळणार होता. मात्र डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले आहे.

सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, शरद पवार यांना नियमित तपासणी आणि काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या विविध चाचण्या सुरू असून, अहवाल आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत स्पष्ट माहिती मिळू शकेल.

प्रकृती स्थिर, खबरदारी म्हणून दाखल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, त्यांचे वय आणि अलीकडची प्रकृती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्या सर्व रिपोर्ट्सची वाट पाहत आहेत, त्यानंतर पुढील उपचार किंवा डिस्चार्जबाबत निर्णय घेतला जाईल.

पूर्वीही झाले होते रुग्णालयात दाखल

गेल्या महिन्यातही प्रकृती बिघडल्यानंतर शरद पवार यांना पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते, पण आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागले आहे.

बारामतीच्या महत्त्वाच्या सभेला राहणार अनुपस्थित

रुग्णालयात दाखल असल्यामुळे शरद पवार त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाहीत. बारामतीमध्ये होणारी प्रचाराची सांगता सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात होती, परंतु प्रकृतीच्या कारणास्तव ते यात सहभागी होणार नाहीत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

जुन्या 500, 1000 रुपयांच्या नोटांबाबत सर्वात मोठी अपडेट, लोकांमधील तो संभ्रम शेवटी मिटला!

Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग

US-Iran : इराणला सर्वात मोठा धक्का… हाहा:कार की शरणागती? इस्लामाबाद मिटिंगपूर्वीच मोठा ट्विस्ट; जगातील हा बलाढ्य नेता…

विलासराव देशमुखांबद्दल संजूबाबाने असं काही म्हटलं..; ऐकून रितेश देशमुखला अश्रू अनावर, जिनिलियाही भावूक

Horoscope Today 21st April 2026 : या तीन राशींचे दारिद्रय कायमचे जाणार, पैशांचा वर्षाव होणार; तुम्ही तर भाग्यवंत नाहीत ना?

Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या…