टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

India-China : श्रीलंकेच्या भूमीवर भारताचा मास्टरस्ट्रोक, ड्रॅगनला जशास तसं उत्तर, UAE च्या मदतीने चीनचा मोठा खेळ बिघडवला

On: April 21, 2026 6:02 PM
Follow Us:

India-China : श्रीलंकेच्या भूमीवर भारताने चीनला धक्का दिला आहे. चीनला संधी मिळाली की तो हात-पाय पसरत जातो. भारताने हीच बाब ध्यानात घेऊन एक मास्टर स्ट्रोक खेळला आहे. त्यामुळे चीनचा खेळ नक्कीच बिघडणार आहे.

India-China : श्रीलंकेच्या भूमीवर भारताचा मास्टरस्ट्रोक, ड्रॅगनला जशास तसं उत्तर, UAE च्या मदतीने चीनचा मोठा खेळ बिघडवला

श्रीलंकेत आत बंदरांसाठी नाही, तर तिथल्या तेल आणि पेट्रोल पुरवठ्यावर नियंत्रण मिळवण्याची लढाई सुरु झाली आहे. जो देश श्रीलंकेच्या ऊर्जा म्हणजे वीज आणि इंधनावर कंट्रोल मिळवेल तिथे त्या देशाची पकड बनेल. आतापर्यंत चीन तिथे मोठ-मोठे पावर प्लांट आणि बंदरं बनवत होता. पण आता चीनची नजर थेट श्रीलंकेच्या पेट्रोल पंपावर आणि तेल डेपोवर आहे. श्रीलंकन जनतेने चिनी कंपन्यांचं तेल विकत घ्यावं अशी चीनची इच्छा आहे. पण यावेळी भारताने सुद्धा चीनला त्याच भाषेत उत्तर द्यायचं ठरवलं आहे. भारत आता संयुक्त अरब अमीरात सोबत मिळून थेट श्रीलंकेपर्यंत पाइपलाइन टाकणार आहे. अलीकडेच उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या श्रीलंक दौऱ्यादरम्यान या मोठ्या प्रोजेक्टवर चर्चा झाली.

चीनची काम करण्याची पद्धत बदलली आहे. आधी ते कर्ज देऊन मोठे स्ट्रक्चर उभे करायचे. त्यांनी कोल पावर प्लांट बनवला. आता चिनी कंपनी ‘सिनोपेक’ हंबनटोटामध्ये रिफायनरी लावत आहे. त्यापेक्षा मोठी बाब ही आहे की, चीनने थेट श्रीलंकेच्या रिटेल मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. बिझनेसच्या दृष्टीने पहायचं झाल्यास चीनला आता फक्त सप्लायर बनून रहायचं नाही, त्याला संपूर्ण बाजारपेठ ताब्यात घ्यायची आहे. श्रीलंकेत तेल आपल्याच रिफायनरीत बनवायचं आणि विकायचही आपल्याच पेट्रोल पंपवर अशी चीनची रणनिती आहे.

सगळा बाजार ताब्यात घ्यायचा चीनचा इरादा

चीनला पेट्रोल पंप उघडून सगळा बाजार ताब्यात घ्यायचा आहे. तेच भारताने ‘सप्लाय चेन’ म्हणजे तेलाची सगळी सप्लाय लाइन आपल्या ताब्यात घेण्याचा मास्टर स्ट्रोक मारला आहे. जेव्हा श्रीलंका कंगाल झालेला, तेव्हा भारतीय कंपनी इंडियन ऑईलनेच तिथे तेल टंचाई दूर केलेली. भारताला आता हे नातं कायमस्वरुपी बिझनेसमध्ये बदलायचं आहे. समुद्री मार्गाने तेल पाठवणं महागडं आणि धोकादायक असतं. म्हणून भारत थेट आपल्या रिफायनरीद्वारे श्रीलंकेच्या त्रिंकोमाली पर्यंत एक मल्टी प्रोडक्ट पाइपलाइन टाकणार आहे. यामुळे श्रीलंकेला 24 तास स्वस्त तेल मिळेल. यामुळे भारत फक्त मदत करणारा देश नाही, तर श्रीलंकेचा बिझनेस पार्टनर बनेल.

श्रीलंकेने हुशारीने निर्णय घेतले

संयुक्त अरब अमीरात हा देश भारताच्या या प्लानमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. त्रिंकोमाली येथे दुसऱ्या महायुद्धाच्यावेळचा एक मोठा ऑईल टँक फार्म आहे. भारत आणि UAE मिळून त्रिंकोमालीमध्ये ग्लोबल एनर्जी हब बनवत आहेत. या प्रोजेक्टमध्ये UAE चा पैसा, त्यांची टेक्नोलॉजी आणि ग्लोबल ऑईल मार्केटमधील त्यांची ताकद आहे. यामुळे थेट चिनी कंपन्यांना टक्कर मिळणार आहे. या बिझनेसच्या सगळ्या खेळात श्रीलंका हुशारीने काम करत आहे. आपली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी ते दोन्ही देशांच्या गुंतवणूकीला प्राधान्य देत आहेत. त्यांनी चीनला पेट्रोस पंप उघडायला परवानगी दिली आहे. पण सोबतच भारत-UAE पाइपलाइनला सुद्धा मान्यता दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now