टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Kolhapur Crime: कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला

घराची दक्षिणेकडील बाजूची आणि रस्त्यालगतची भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्याचे काम सुरू होते. याच वेळी रस्त्यावरून जात असलेल्या दोघींच्या अंगावर अचानक भिंतीचा मोठा भाग आणि मातीचा ढिगारा कोसळला.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा शहरात आज (20 एप्रिल) एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शहरातील ‘वाणी गल्ली’ परिसरात एका जुन्या घराची भिंत पाडण्याचे काम सुरू असताना, ही भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेत अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे. वैष्णवी तुकाराम भोसले (इयत्ता 6 वी वय 14 वर्षे) आणि  ज्योती नितीन कुंभार (प्राध्यापिका, वय 45 वर्षे) अशी दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

नेमकी घटना काय घडली ?

मिळालेल्या माहितीनुसार, आजरा येथील वाणी गल्लीत डॉ. देशपांडे यांच्या मालकीचे एक जुने घर आहे. या घराची दक्षिणेकडील बाजूची आणि रस्त्यालगतची भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्याचे काम सुरू होते. याच वेळी रस्त्यावरून जात असलेल्या दोघींच्या अंगावर अचानक भिंतीचा मोठा भाग आणि मातीचा ढिगारा कोसळला. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याने दोघींचाही जागीच अंत झाला. दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या ललिता भोसले यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या गडहिंग्लज येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जुन्या घराचे पाडकाम सुरू असताना सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एकाच वेळी प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे संपूर्ण आजरा शहरावर शोककळा पसरली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Nasrapur Case: नसरापूरच्या नराधमाला फाशीच!, चिमुकलीवर अत्याचार करुन संपवणाऱ्या भीमराव कांबळेला शिक्षा, पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

Nagpur Accident News: थरारक ! रस्त्यांवर रेसिंगच्या नादात भरधाव कार थेट पोहेवाला शॉपमध्ये घुसली

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा

Kolhapur Accident News: इचलकरंजी एसटी डेपोत भीषण अपघात, कार गर्दीत घुसली, लोकांना चिरडलं, सहा जण जखमी

Jalgaon Accident : गुजरातहून येणाऱ्या वऱ्हाडाचा जळगावात भीषण अपघात, पाच जणांनी जागेवरच जीव सोडला

Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण ‘असे’ फुटले बिंग, नेमकं काय घडलं?