जेव्हा वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतीचा वापर केला जातो. कमी वेळेत चांगला परिणाम दाखवेल अशा पद्धतीच्या शोधात असतात. व्यस्त लाइफस्टाइलमध्ये, जिममध्ये जाण्यासाठी आणि योगासने करण्यासाठी वेळ काढणे कठीण होते. अशा परिस्थितीत लोक घरगुती उपायांकडे वळतात.
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपचार हे बेस्ट असतात. शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी योग्य आहार उत्तम परिणाम दर्शवतो यात शंका नाही. वेट लॉससाठी तुम्ही घरच्या घरी एक खास चहा बनवू शकता. हा चहा बनवण्यासाठी अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्या आणि उकळून चहा तयार करा.
चवीसाठी त्यात अर्धा चमचा मधही टाकता येतो. वजन कमी करण्यासोबतच हा चहा प्यायल्याने शरीराला इतर फायदे होतात. हा चहा शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो. हा चहा प्यायल्याने शरीरातील वाईट टॉक्सिन्स बाहेर पडतात. बडीशेप आणि जिऱ्याच्या चहाचा पचनक्रियेवर चांगला परिणाम होतो.