आरबीआयने बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. साप्ताहिक सुटीव्यतिरिक्त १२ आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त बँकांना सुट्टी असेल. फेब्रुवारीमध्ये, साप्ताहिक बँक सुट्ट्यांसह ७ दिवस बँक सुट्ट्या असतील, ज्यात दोन शनिवार आणि चार रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. होळी आणि रामनवमीच्या सुट्टीसह मार्चमध्ये एकूण ९ दिवस बँका बंद राहणार आहेत.
ज्यामध्ये दोन शनिवार आणि चार रविवारचा समावेश आहे. एप्रिलमध्ये अनेक बँकांना सुट्ट्या असतात. या महिन्यात ५ रविवार असल्याने बँका त्या ५ दिवस बंद राहणार आहेत, तर दोन शनिवार सुटी आहेत. याशिवाय रमजान, महावीर जयंती आदी कारणांमुळे बँका बंद राहणार आहेत. मे महिन्यात बँकांच्या साप्ताहिक सुटीव्यतिरिक्त ५ मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त बँका बंद राहतील.
जून महिन्यात साप्ताहिक सुट्टीमुळे बँका ६ दिवस बंद राहणार आहेत. याशिवाय २९ जून रोजी बकरी ईदमुळे बँका बंद राहणार आहेत. जुलै महिन्यात बँकांना दीर्घ सुट्ट्या असतात. जुलैमध्ये १० दिवस बँका बंद राहतील. दोन शनिवार आणि ५ रविवार व्यतिरिक्त बँक मोहरम आदींमुळे दहा दिवस बँका बंद राहणार आहेत. ऑगस्टमध्ये बँकांना दीर्घ सुट्या असणार आहेत. शनिवारच्या २ व रविवारमुळे ४ तर स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधनामुळे बँकेला सुट्टी राहणार आहेत, असे एकूण १० दिवस बँका बंद राहतील. सप्टेंबरमध्ये ९ दिवस बँका बंद राहणार आहेत.
शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त गणेश चतुर्थी, जन्माष्टमी, मिलाद-ए-शरीफ या सणांमुळे बँका बंद राहतील. ऑक्टोबरमध्ये सणांची रांगच असते. त्यामुळे बँकांना दीर्घ सुट्या असणार आहेत. गांधी जयंती, दुर्गापूजा, कालीपूजा या सणांमुळे जवळपास ९ दिवस बँका बंद राहणार आहेत.
यात शनिवार आणि रविवार या दोन दिवसांचाही समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, छठपूजा, करवाचौथ, गोवर्धन पूजा यामुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. नोव्हेंबरमध्ये शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त बँका १० दिवस बंद राहणार आहेत. डिसेंबरमधील साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त २५ डिसेंबर रोजी नाताळनिमित्त बँका बंद राहतील. याशिवाय राज्यांच्या सुट्ट्या वेगळ्या आहेत. एकणू ८ दिवस बँका बंद राहतील.