ऑस्ट्रेलियात झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने चमकदार कामगिरी केली. भारत या स्पर्धेत विजेता होऊ शकला नाही, मात्र सूर्याची कामगिरी सर्वांनाच लक्षात राहील. त्याचा हा फॉर्म अजूनही टिकून असल्याचे दिसत आहे. कारण सध्या खेळल्या जात असलेल्या रणजी करंडक स्पर्धेत त्याने जबरदस्त खेळी केली.
मंगळवारी झालेल्या या सामन्यात सूर्याचे वादळ पुन्हा दिसून आले. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज टी 20 स्टाईलने खेळत सूर्यकुमार यादवने 16 चेंडू मध्ये 66 धावांचा पाऊस पडला. आपल्या खेळीत त्याने 80 चेंडूंमध्ये मध्ये 90 धावा केल्या.
मुंबई विरुद्ध हैदराबाद संघात हा सामना खेळला जात आहे.
मुंबईचे नेतृत्व करताना सूर्याने ही जबरदस्त खेळी केली. त्याचे शतक थोडक्यात हुकले. आपल्या खेळीत त्याने सुमारे 15 चौकार व एक षटकार खेचले. याचाच अर्थ 16 चेंडूमध्ये सुमारे 66 धावा केल्या. मुंबईने आतापर्यंत दोन गडी गमावून 326 धावा केल्या आहेत. तर यशस्वी जयस्वाल सुमारे 138 धावा काढून नाबाद आहे.