सुपरस्टार प्रभाससोबत क्रिती सेनन बांधणार लग्नगाठ?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन सध्या त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. परंतु चित्रपटाव्यतिरिक्त हे दोन्ही कलाकार एकमेकांना डेट करत असल्याच म्हटलं जात आहे. चित्रपटाच्या सेटवरील दोघांचे बॉन्डिंग खूप वाढले आहे. ही वाढती चर्चा पाहून क्रितीने याबाबत खुलासा केला आहे. क्रितीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी टाकली. ज्यातून तिने ही अफवा असल्याचं सांगितलं.
क्रिती आणि प्रभास मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची बातम्या समोर येत होत्या. ज्यावर आता स्वतः क्रितीने उत्तर दिले आहे. क्रितीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिलंय की, हे प्रेम नाही आणि कोणताही PR नाही. 

आमच्या भेडिया प्रमोशनमध्ये झालेली मजा-मस्ती जास्तच व्हायरल झाली आणि त्यामुळे अफवा वाढत गेल्या. काही पोर्टल आमच्या लग्नाची घोषणा करतील, त्याआधीच मी तुमचा गैरसमज दूर करु इच्छिते. या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon