Sunday, September 8, 2024
Homecrimeसहा अपत्ये झाल्याने आयेशाने सुरू केला चोरीचा धंदा

सहा अपत्ये झाल्याने आयेशाने सुरू केला चोरीचा धंदा

अखेर तिने चोरीचा धंदा सुरू केला
आयेशा शेख ही अत्यंत गरीब परिस्थितीत हलाखीचर जीवन जगत आहे.६ अपत्य असल्याने त्यांना जगवायच कसं हा प्रश्न तिच्या समोर पडला होता त्यामुळे.तिने अखेर चोरीचा धंदा सुरू केला.बुरखा घालून बस मध्ये चढण्यासारख नाटक करत होती.गर्दीचा फायदा घेत  महिला प्रवाशांच्या पर्सवर डल्ला मारत होती.अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांनी दिली.
सोलापुरात गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरी करणारी अटल महिला आरोपीला अटक करून ५ लाख २९ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोलापूर बस स्थानकात प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीत वाढ झाली होती.फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे डीबी पथक महिला प्रवाशांना लुटणाऱ्या महिलेचा तपास करत होते.
२१ ऑक्टोबर रोजी अश्विनी गोपाळ पाटील (वय-३४,रा,गणेश नगर,हैद्राबाद रोड,सोलापूर) या दिवाळी निमित्ताने माहेरी जात होत्या.एसटी स्टॅण्डवर बोरवली बस मध्ये चढताना अज्ञात महिलेने गर्दीचा फायदा घेत धक्काबुक्की करत त्यांची सोन्याचे दागिने असलेली पर्स लंपास केली होती.
याबाबत अश्विनी पाटील यांनी २१ ऑक्टोबर रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २४ तासाच्या आत एका संशयीत महिलेस चोरलेले सोने विकण्यास येत असताना लक्ष्मी मंडई जवळ ताब्यात घेतले.आयेशा युसूफ शेख (वय-३३,रा.समाधान नगर,अक्कलकोट रोड सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव होते.
तिला ताब्यात घेतल्या नंतर तिने गुन्हा कबुल केला.फक्त एसटी बसेस मध्ये गर्दीचा फायदा घेत चोरी करत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. पोलिसांनी तिच्या कडून एकूण साडेबारा तोळे वजनाचे ५ लाख २९ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सध्या ती न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आयेशा शेखचा शोध लावला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments