Sunday, September 8, 2024
Hometop newsशिंदेंनी भाजपची साथ सोडली तर युतीबाबत विचार करू

शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर युतीबाबत विचार करू

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आमचा खिमा केला आहे. भाजपसोबत गेलो असतो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खिमा केला असता, पण आम्ही तसे केले नाही. माझी आणि माझ्या पक्षाची ताकद मला माहीत आहे. काँग्रेस आणि शरद पवारांना मी चांगला ओळखतो, सेनेसोबत समझोता करण्यासाठी मी तयार आहे, एकत्र लढण्याबाबत ठाकरेंकडून जाहीर करणं बाकी आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

आंबेडकर यांनी मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात आज पत्रकार परिषद घेतली आहे, त्यावेळी ते बोलत होते. आमची सेनेसोबत जाण्याची भूमिका सेनेने जाहीर करायची आहे. जाहीरपणे कधी सांगायचे हे सेनेने ठरवावे. चार भिंतीत एकत्र जायचे हे आमचे ठरले आहेत. सेना आमच्यासोबत येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय, काँग्रेस-एनसीपी आमच्या सोबत येणार नाही हे मला माहीत आहे. 
शिवसेनेनी आता आमची युती कधी होणार हे जाहीर करण्याबाबत ठरवले पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपची साथ सोडल्यास आम्ही त्यांच्यासोबत युतीचा विचार करू, असेही आंबेडकर म्हणाले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments