Sunday, October 6, 2024
Hometop newsशरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने पवार फोन करत जीवे मारण्याची धमकी दिली. मंगळवारी पवारांना निनावी फोन आल्याचे समजते. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षात पवार यांना दोन वेळा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे पवारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करून पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबई आकाराचे देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन ठार मारणार असल्याचे सांगितले आहे.
याआधी १९ सप्टेंबर २०२२ रोजी  पवार यांना धमकीचा फोन आला होता. पवार कुर्डूवाडीत नियोजित दौऱ्याला जाण्यापूर्वी हा फोन आला होता. या दौऱ्यावर पवारांनी येऊ नये, अशा आशयाचा कॉल त्यांना आला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments