टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडले : सात जणांचा मृत्यू

Follow Us:
सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ भीषण अपघात झाला असून दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडले. या अपघातात ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
तसेच जखमींना जवळ असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.
राज्यातील वारकरी पंढरीच्या दिशेने पायी निघाले आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वारकरी पायी पंढरपूरला जात असतात.
यामध्ये अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी निघाले होते. परंतु या वारकाऱ्यांवर काळाने घाला घातला. दिंडी सांगोला तालुक्यात जुनोनी गावाजवळ पोहोचली होती. परंतु या दिंडीमध्ये भरधाव कार घुसली आणि ७ जणांचा बळी गेला. 
सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Parbhani Accident : स्विफ्ट कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा भयंकर अंत, बहीण-भावाची भेट अधुरीच!

Pimpri Chinchwad Accident: काळाचा घाला! लेह-लडाखवरून परतताना पिंपरीतील 3 मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; 30 फूट खोल दरीत कार कोसळून मृत्यू

Solapur Accident: जीवलग मित्र चहा प्यायला गेले, पण भीषण अपघातात जागीच मृत्यू; कारचा चेंदामेंदा, कुटुंबाचा आक्रोश

Baramati Crime : धावत्या एसटी मध्ये प्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आधी शेजारी बसलेल्यावर वार केला, नंतर आरोपीने स्वतःलाही…; बारामती हादरली

भयंकर! स्विफ्ट कार थेट कॉलेज तरुणींच्या घोळक्यात घुसली, मुलीला 100 फूट फरफटत नेलं

दौंड च्या कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी अजितदादांच्या आमदाराच्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात; गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?