संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना मुंबईत घडली आहे. लव्ह जिहाद प्रकरणात मुंबईतील एका 25 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पुनावाला याने संबंधित तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. यातील पिडिता श्रद्धा तिच्या शरीराचे 35 तुकडे फ्रिज करून ठेवण्यात आले होते.
एका डेटिंग अँप वरून श्रद्धा हिची मैत्री आफताब याच्याशी झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. घरच्यांचा विरोध डावलून श्रद्धा आफताब बरोबर पळून गेली. कॉल सेंटरमध्ये काम करणारी श्रद्धा ही आफताब बरोबर दिल्ली येथे राहण्यास गेली. गेल्या मे महिन्यात त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.
या रागाच्या परत आफताब याने श्रद्धाची हत्या केली. श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून त्याने हे तुकडे जंगलात फेकून दिले. काही तुकडे त्यांनी फ्रीजमध्ये ठेवले होते. आफताबने अतिशय शांत डोक्याने श्रद्धाची हत्या केली.
ज्या डेटिंग ॲपवरून आफताबने श्रद्धाला आपल्या जाळ्यात खेचले, त्याच अँप वरून आणखी तरुणीशी मैत्री करून त्याने तिच्याशी रोमान्स सुरू केला. एकीकडे फ्रिज मध्ये मृतदेहाचे तुकडे असताना दुसऱ्या रूममध्ये आफताब या तरुणीशी रोमान्स करत होता. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून अखेर आफताबला अटक केली आहे. या प्रकरणाने देश हादरला आहे.