सध्याच्या हिवाळ्याच्या हंगामात सर्वत्र पेरूची आवक सुरू झाली आहे. हिवाळ्यात पेरू खाण्याचे अनेक फायदे आहेत. इतर ॠतूमध्ये पेरू मिळत नाहीत. त्यामुळे हिवाळ्यात येणार्या पेरूंचे सेवन करणे तुमच्या शरीरासाठी लाभदायी आहे. या फळात व्हिटॅमिन सी आढळते. जे तुम्हाला विविध रोगांशी लढण्याची क्षमता बहाल करते.
इतकेच नव्हे तर संत्र्याच्या तुलनेत पेरूमध्ये चारपट जास्त व्हिटॅमिन सी आढळते. दात आणि हिरड्यांसाठी पेरू गुणकारी आहे. तोंडातील फोड दूर करण्यासाठी पेरूची पाने चावून खाल्ल्यास फायदा होतो. पेरूचा रस जखम त्वरीत भरून काढतो.
काळ्या मीठासोबत पेरू खाल्ल्यास पचनासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. याशिवाय पित्ताची समस्या नाहीशी होते. पाईल्स उपचारात पेरूची साल अतिशय लाभदायी आहे. पाच किंवा दहा ग्रॅम पेरूच्या सालीचे चुर्ण बनवून तो प्यायल्याने आराम मिळतो.