काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरुद्ध जे वक्तव्य केले त्यावरून राजकीय वर्तुळातुन टीका केली जात आहे. राहुल गांधी जे काही करत आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी केले तर ठीक. पण कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काय करत असतील तर त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल.
आम्ही भारत जोडो यात्रेला सुरक्षा दिली आहे. त्यांची यात्रा राज्याबाहेर सुरक्षितपणे पाठवू. पण त्यांनी महाराष्ट्रातील वातावरण बिघडवू नये, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. गुजरातमधील भावनगर येथे फडणवीस निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असताना फडणवीसांनी राहुल यांना सूचक इशारा दिला.
राहुल यांची पदयात्रा ही भारत जोडो यात्रा नव्हे तर मोदी विरोधी जोडो यात्रा आहे. कारण काँग्रेसला आता लक्षात आले की, भारताची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे अस्तित्व टिकवायचे असेल देशभरात मोदींच्या विरोधकांना जोडायला हवे, तसे केले नाही तर देशात काँग्रेस विसर्जित होईल. त्यासाठी राहुल हे भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत, असे म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली.