राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. राज्यात २०१४ मध्ये आघाडी सरकार होतं. तेव्हा राष्ट्रवादीने अचानक सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडले.
यामुळे राज्यात भाजप वाढण्यास आणि सत्तेत येण्यास मदत झाली, असा आरोप चव्हाण यांनी केला. चव्हाण म्हणाले की, राज्यात २०१४ मध्ये आघाडी सरकारचं काम चांगलं चाललं होतं.
मात्र या सरकारवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेपासून आणि आघाडीपासून दूर झाली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार पाडले नसते तर राज्यात पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेत आले असते. पण तसे न झाल्यानं याचा फायदा भाजपला जास्त झाला. एक प्रकारे राज्यात भाजप सरकार येण्यास कोण कारणीभूत हे सर्वांनाच समजले.