Saturday, September 21, 2024
Hometop newsमोठी बातमी! आपल्या महाराष्ट्रातील जत तालुक्यावर कर्नाटकाचा दावा

मोठी बातमी! आपल्या महाराष्ट्रातील जत तालुक्यावर कर्नाटकाचा दावा

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुका कर्नाटकात समाविष्ट करण्याचे सूतोवाच केले.
कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यम शाळांना अनुदान देईल आणि शेजारी राहणाऱ्या कन्नडच्या स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शनही उपलब्ध करून देईल, असेही बोम्मई म्हणाले.
जत तालुक्याला (सांगली जिल्ह्यातील) भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, त्यांना पाणी देण्यासाठी आम्ही एक कार्यक्रम घेऊन आलोत. तेथील सर्व ग्रामपंचायतींनी जत तालुका कर्नाटकात सामील व्हावा, असा ठराव केला.
जत तालुका कर्नाटकात यावा याचा गांभीर्याने विचार करत असल्याचेही बोम्मई यांनी सांगितले. आम्ही कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत महाराष्ट्रातील कन्नड शाळांना विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात राहणार्‍या कन्नडिगांनी स्वातंत्र्य लढा, एकीकरण चळवळ आणि गोवा मुक्तीसाठी लढा दिला, त्यांना पेन्शन दिली जाईल. आम्ही आवश्यक कागदपत्रे गोळा करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments