सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्मा हिचे आज निधन झाले. मृत्यू समयी ती 24 वर्षांची होती. कर्करोग आणि नंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे ती कित्येक दिवसापासून आजारी होती.
अखेर आज तिने शेवटचा श्वास घेतला. मंगळवारी तिला अनेक वेळा हृदयविकाराचा झटका आला होता. ही अभिनेत्री गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक रोगांशी झुंज देत होती. वयाच्या केवळ 24 व्या वर्षी कोलकता येथील एका रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.
एक नोव्हेंबर रोजी बेन स्ट्रोकमुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर तिच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव सुरू झाला. दिवसेंदिवस तिची प्रकृती ढासळली. विशेष म्हणजे या आधी तिने कर्करोगाला हरवले होते. मात्र बेन स्ट्रोक पुढे ती जिंकू शकली नाही आणि अखेर तिचा आज मृत्यू झाला. तिने कित्येक लोकप्रिय मालिका आणि टीव्ही शोमध्ये काम केले होते.