भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. या सामन्याच्या अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या. विराटच्या या खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानच्या दिलेले 160 धावांचे आवाहन पूर्ण केले. मात्र या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.या विजयानंतर हार्दिक पांड्याला त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत आठवली. या आठवणीत मुलाखत देताना तो ढसाढसा रडला.हालाखीच्या परिस्थितीतून इथवर आलेल्या हार्दिकला या विजयानंतर त्याच्या घरातल्यांनी त्याच्या क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत आठवली आणि मग काय तो मैदानातच ढसाढसा रडला.यावेळी रडताना हार्दिकने त्याच्या घरच्यांनी त्याच्या क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत आणि केलेल्या बलिदानाची आठवण केली. त्याच्यासाठी ते एका शहरातून दुसरीकडे गेले. तो स्वत:ही एक बाप आहे मुलावर खूप प्रेम करतो पण घरातल्यांनी केलेले बलिदान खूप मोठे होते, असे पांड्या म्हणाला.
इथे हि वाचा