भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यात 9 डिसेंबर रोजी झटापट झाली होती. दरम्यान आता सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तवांग झटापटीचा असल्याचं सांगत सोशल मीडियात शेअर करण्यात येत आहे.
व्हिडिओत दिसत आहे की, भारतीय सैन्य चिनी सैन्याला चक्क लाठ्या-काठ्यांनी झोडपून काढत आहेत.
भारतीय सैन्याकडून होत असलेला लाठ्या-काठ्यांचा मारा पाहून चिनी सैनिकांनी घटनास्थळावरुन पळ काढला. भारतीय सैन्याकडून चिनी सैन्याला लाठ्या-काठ्यांनी झोडपून काढण्यात आले. हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.