टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शिवसेना आणि शिंदे गट येणार एकाच व्यासपीठावर?

On: December 15, 2022 4:43 AM
Follow Us:

बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रत्नागिरी जिल्ह्यात एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 16 डिसेंबरला कोकणात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी येथे 16 डिसेंबर रोजी 750 कोटींच्या विविध कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. 

निमंत्रण पत्रिकेमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची नावे आहेत. निमंत्रण पत्रिकेत स्थानिक खासदार विनायक राऊत आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांचीही नावे आहे. राजापुरातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पांवरूनही समर्थक आणि विरोधकांमध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या 16 डिसेंबरला राजकीय मतभेद पाहायला मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now