- टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पुढील सामना २ नोव्हेंबरला होणार आहे. ॲडलेडमध्ये होणाऱ्या या सामन्यात भारताची लढत बांगलादेशशी होणार आहे. सामन्यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने टीम इंडियाला इशारा दिला असून मोठ्या उलटफेराला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, असे म्हटले आहे.
- या सामन्यापूर्वी शाकिबची पत्रकार परिषद झाली. तो म्हणाला की, भारत विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने येथे आला आहे, तो सर्वांचा फेव्हरेट आहे. आम्ही या उद्देशाने येथे आलो नाही. अशा स्थितीत आम्ही भारताला हरवले तर मोठी खळबळ माजेल. त्यामुळेच आमचा संपूर्ण फोकस हा उलटफेर करण्यावर आहे.