सध्या कॉलेजमधल्या पोरींचा हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नाशिकच्या गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. यात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- व्हिडीओमध्ये तरुणींमध्ये कॉलेजच्या आवारातच हाणमारी सुरू झाल्याचे पाहायला मिळते. यात त्या एकमेकींना केस ओढून मारहाण करताना दिसत आहेत. या तरुणींमध्ये नेमका कोणत्या कारणावरुन वाद झाला, हे अद्याप समजू शकले नाही. व्हिडीओमध्ये चार तरुणी दिसतात. यातील दोघी एकमेकींचे केस ओढून हाणामारी करत आहेत. इतर दोघी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.