दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये हॅलोवीन फेस्टीवल या कार्यकमात चेंगराचेंगरीत 149 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या चेंगराचेंगरीत 50 जणांना हृदयविकाराचा झटका होता.
या घटनेत 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सियोलमध्ये हॅलोवीन फेस्टीवलमध्ये जवळपास 1 लाखाहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता.
त्यावेळी या पार्टीमध्ये सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर अचानक या गर्दीचे रुपांतर चेंगराचेंगरीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. या दुर्घटनेनंतर राष्ट्रपती यूं सुक-येओल यांनी योंगसान-गु जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद पथकाला तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.