Sunday, October 6, 2024
Homecrimeब्रेकिंग! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

ब्रेकिंग! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक केली आहे. ठाण्यातील वीवीयाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आज आव्हाड यांना केली अटक आहे. यासंदर्भात आव्हाड यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली.
आज दुपारी मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाही तर तुम्ही पोलीस स्टेशनला या, असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो, असे ट्विटआव्हाड यांनी केले.
मी पोलीस स्टेशनला गेलो असताना, त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावर अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल, असेही ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments