टी 20 विश्वचषकमध्ये भारतीय संघ शानदार कामगिरी करत आहे. भारताने पहिले दोनही सामने जिंकत विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तान संघाला पराभूत केले.
त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँड्स संघाला पराभवाचं पाणी पाजलं. माजी कर्णधार विराट कोहली याने या दोन्ही सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली.
भारतीय संघाचा पुढील सामना 30 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजता सामना सुरु होईल. भारतासाठी हा महत्त्वपूर्ण सामना आहे. कारण, आफ्रिका संघाकडे जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत आणि ते विरोधी संघांना चिंतेत टाकू शकतात.