Sunday, September 8, 2024
Hometop newsब्रेकिंग! कर्नाटकात मास्क सक्ती ; प्रशासन अलर्ट मोडवर

ब्रेकिंग! कर्नाटकात मास्क सक्ती ; प्रशासन अलर्ट मोडवर

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान भारतातही खबरदारीची उपायोजना केली जात आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी मास्क वापरण्याबाबत नागरिकांना आवाहन केले. तसेच सोशल डिस्टन्स पाळा, असेही ते म्हणाले. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सुद्धा नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. बंद ठिकाणी, एसी रूममध्ये कर्नाटक सरकारने मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेतली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. तर महाराष्ट्रातील अनेक धार्मिक स्थळांबाबत मास्क वापरण्यासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व साई भक्तांना मास्क वापरण्याचे आवाहन शिर्डीतील साईबाबा संस्थांनने केले आहे. तसेच कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. 
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments