रविवारी सिडनीत खेळल्या गेलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप सामन्याच्या फायनलमध्ये इंग्लंडने बाजी मारली आहे. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला आहे. इंग्लंडने हा वर्ल्ड कप जिंकला आहे.
टॉस जिंकून इंग्लंडने पाकिस्तानला फलंदाजी दिली होती. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजासमोर पाकिस्तानचे फलंदाज फेल गेले. पाकिस्तानी केवळ 138 धावांचे आव्हान इंग्लंडला दिले होते. इंग्लंडची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यांनी पावर प्ले मध्येच महत्वाचे तीन बळी गमावले. इंग्लंडची अवस्था तीन बाद 45 अशी होती. हा संघ अडचणीत आला होता.
पाकिस्तानने सामन्यावरची पकड मजबूत केली होती. मात्र इंग्लंडचा ब्रेन स्ट्रोक याने जबरदस्त खेळी करून पाकिस्तानला पराभूत केले. त्याने 52 धावांची मोठी खेळी केली. पाकिस्तानचे फलंदाज या सामन्यात फार चमकू शकले नाहीत. इंग्लंडने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली. त्यामुळेच हा संघ आता जगजेत्ता बनला आहे. आपणच वर्ल्ड कप जिंकू, अशी डरकाळी पाकिस्तानने मारली होती. त्यांची ही डरकाळी पोकळ ठरली असून इंग्लंडचे गोलंदाज खरे वाघ ठरले आहेत.