घरवाली बाहरवाली, क्योंकी मैं झूठ नहीं बोलता, जुडवा यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री रंभाचा कॅनडामध्ये कार अपघात झाला आहे. त्यावेळी तिच्यासोबत गाडीमध्ये तिची मुलगी देखील होती. या कार अपघातामध्ये रंभा आणि तिच्या मुलीला दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रंभाने याबाबत माहिती दिली आहे.
माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यावेळी माझ्यासोबत माझी मुलगी आणि तिचा संभाळ करणारी नॅनी देखील सोबत होती. माझी मुलगी साशा सध्या हॉस्पिटलमध्ये मध्ये आहे आणि तिच्यावर उपचार सुरु आहेत. खूप वाईट दिवस आणि वाईट वेळ.
कृपया माझी मुलगी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करा, या आशयाचे ट्वीट केले आहे. रंभाने हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड, तामिळ, मल्याळम, बंगाली, भोजपूरी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे.