पठाण चित्रपटाचे पहिले गाणे बेशरम रंग रिलीज झाल्यानंतर त्यावरून गदारोळ माजला होता. या गाण्यामध्ये दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या बिकिनीच्या रंगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. याबाबत सुरू असलेला वाद अजूनही शमलेला नाही. आता या चित्रपटातील ‘झूमे जो पठाण’ हे नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे.
हे गाणे देखील शाहरुख आणि दीपिकावर चित्रीत करण्यात आले असून, त्याचा फर्स्ट लूक आणि पोस्टर रिलीज रिलीज करण्यात आले. या पोस्टरने आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली. या गाण्याने देखील आता सोशल मीडियावर कल्ला केला आहे. रिलीज होताच हे गाणे ट्रेंड होऊ लागले आहे.