सध्या बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अशात हाती आलेल्या बातमीनुसार बाहुबली फेम तमन्ना भाटिया देखील लवकरच लग्न करणार आहे. आलिया भट्ट, कतरीना कैफ पाठोपाठ तमन्ना लग्नबंधनात अडकणार आहे. तमन्नाने आजवर बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अनेक चित्रपटात काम केले आहे आणि तमन्नाने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे.
रिपोर्टनुसार तमन्नाने एका बिझनेसमनचा प्रस्ताव स्वीकारला असून लग्नासाठी होकारही दिला आहे. परंतु याविषयी तिने स्वतःहून सोशल मीडिया किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर स्पष्ट भाष्य केले नाही, त्यामुळे खरं काय आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.