- भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल टी-20 विश्वचषकाचा महामुकाबला पहायला मिळाला. भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने हार्दिक पांड्याला सोबत घेऊन भारताच्या विजयाचा पाया रचला.
- हा सामना सुरू असताना तब्बल 1.8 कोटी लोकांनी भारत-पाकिस्तानचा लाइव्ह पाहिला.
- भारतात हा सामना स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित करण्यात आला होता. डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारचे आकडे कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
- डिस्ने प्लस हॉटस्टारवर 1. 8 कोटी लोकांनी भारत-पाकिस्तान सामना पाहिला आहे. जेव्हा भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं सामन्याचा पहिला चेंडू टाकला, त्यावेळी 36 लाख लोक पाहत होते. तर, पाकिस्तानचा डाव संपला तेव्हा हा आकडा 1.1 कोटी इतका होता. तसेच भारतीय संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा 40 लाख लोक लाइव्ह स्ट्रीमिंग पाहत होते.
- दरम्यान, आशिया चषक 2022 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला सामना तब्बल 1.4 कोटी लोकांनी डिस्ने प्लस हॉटस्टार लाईव्ह पाहिला होता. दरम्यान काल रनमशीन कोहलीने उत्कृष्ट कामगिरी करत 53 चेंडूत 83 धावा काढल्या.