बापरे! पुण्यात भररस्त्यात शिवशाहीला आग

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

पुण्यात आज आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. पहिली आग एका हॉटेलला लागली होती. ही आग विझत नाही तोवर शास्त्रीनगर चौकात भररस्त्यात धावणाऱ्या शिवशाही बसला आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही.
पुण्यातील रहदारीच्या असलेल्या शास्त्रीनगर परिसरात शिवशाही बसला आग लागली. त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती. यवतमाळ-औरंगाबाद-पुणे असा प्रवास करत ही बस येरवाडमधील शास्त्रीनगर येथील गलांडे हॉस्पिटलजवळ आली. 

तेव्हा चालकाला काहीतरी बिघाड झाल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यांनी गाडी बाजूला घेत प्रवाशांना खाली उतरवलं. प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर गाडीने पेट घेतला. चालकाच्या प्रसंगवधनामुळे तब्बल ४२ प्रवाशांचा जीव वाचला आहे. दरम्यान, ही बस सतत गरम होत होती. तरीही ती पुण्यापर्यंत आली. त्यानंतर चालकाला बिघाड झाल्याचं लक्षात येताच त्याने गाडी रिकामी केली.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon