महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे यांच्या चित्रपट शाखेने बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना धमकी दिली आहे. बॉलीवूडमध्ये पाकिस्तानमधील कुठल्याही कलाकाराला काम दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनसे उपाध्यक्ष आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर निर्मात्यांना दिला आहे.
बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आल्याचे कानावर येत आहे. ही नीच प्रवृत्ती वेळीच ठेचावीच लागते, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच का हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीला पाकिस्तान कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा धमकी वजा इशारा खोपकर यांनी दिला आहे.