पंढरपूरमध्ये आहिल्याबाई होळकर आणि बायजाबाई शिंदे यांनी बांधलेली राम आणि कृष्ण ही दोन मंदिरे पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळं तोडली जाणार आहेत. आता यावरून भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या मुद्द्यावरून स्वामी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
ट्विटमध्ये त्यांनी मोदींची तुलना रावणाशी के. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, मोदी रावणासारखेच धार्मिक असल्याचा दावा करत आहेत. ते मंदिरे पाडण्याचं आणि त्यावर ताबा मिळवण्याचं काम करत आहेत. उत्तराखंड आणि वारणसीमध्येही हेच झालं. मोदी आता देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीनं पंढरपूरातील पवित्र स्थळांना नष्ट करण्याची योजना आखत आहेत. ही कत्तल रोखण्यासाठी मी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.