Sunday, October 6, 2024
Homejobsदहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी

दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी

दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. भारतीय टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलच्यावतीने विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. एकूण 15000 पदांची भरती होणार आहे. यामध्ये पोस्टमनच्या  9884, मेल गार्ड 147 तर एमटीएसच्या पाच हजार पदांची भरती होईल.

पात्र उमेदवारांना डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती अधिक तपशीलवार पणे देण्यात आली आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शेवटची तारीख यांचा समावेश आहे. पोस्टमन किंवा मेल गार्ड पदासाठी अर्ज करणारा विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असावा.
याशिवाय त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. या विविध रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्याचे वय 18 ते 25 दरम्यान असावे. पात्र उमेदवारांना 33 ते 35 हजार रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल. या प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी dopsportsrecruitment.in या वेबसाईटवर क्लिक करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments