Saturday, September 21, 2024
HomejobsSBI Jobs खुशखबर! नोकरीची सुवर्णसंधी

SBI Jobs खुशखबर! नोकरीची सुवर्णसंधी

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये सुमारे 8 हजार 773 लिपिक पदांच्या जागांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आज लिपिक पदांच्या पदभरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

यामध्ये 8 हजार 773 लिपिक पदांच्या जांगाच्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून, या भरतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर सात डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. याच जाहिरातीत नियम व अटींचाही समावेश करण्यात आला असून, तेव्हा पदभरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी ही पदभरती एका सूवर्णसंधीपेक्षा कमी नसल्याचे दिसून येत आहे.
या जागांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे. यासाठी एसबीआयशी संपर्क साधू शकता.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments