भारतीय संघाने मायदेशात खेळवलेल्या टी 20 आणि वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध विजय मिळवला होता. मात्र, टी 20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारतीय संघाच्या पारड्यात पहिला पराभव पडला. या पराभवाचे कारण आफ्रिका संघ ठरला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
यावेळी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 133 धावा केल्या. हे आव्हान आफ्रिका संघाने 19.4 षटकात पार केले. दरम्यान टीम इंडियाने जाणूनबुजून हा सामना गमावला आहे. पाकिस्तानने पुढे जावे असे भारताला कधीच वाटत नाही, असे पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिक म्हणाले.