बॉलिवूडचा शाहरुख खानचा पठाण हा सिनेमा पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमाचे बेशरम रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून बॉयकॉट पठाण हा ट्रेंड चालू आहे.
मात्र, आता शाहरूखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हिंदू धर्माबदल त्याने त्याचे मत मांडले आहे. शाहरुखला प्रेक्षकांपैकी कोणीतरी एक व्यक्ती प्रश्न विचारते की, तो हिंदू असता किंवा त्याचे नाव वेगळे असते तर त्याच्यासाठी परिस्थिती वेगळी असती का? SRK म्हणजे शेखर राधा कृष्ण असते तर..?, असा प्रश्न त्या व्यक्तीने विचारल्यानंतर शाहरुख म्हणाला की, मी जर हिंदू समाजात जन्माला आलो असतो तरी काहीही फरक पडला नसता. एखादा हिंदू असतो तेव्हा त्याचे आयुष्य वेगळे असते का? मला वाटतं, एका कलाकारामध्ये ही प्रवृत्ती नसते. तुम्ही कोणत्या समाजाचा, पंथाचा होता. तुम्हाला अभिनय, कला महत्वाचं वाटत असेल तर याचा विचार करू नका, असे शाहरुख म्हणाला.