मुंबईतील श्रद्धा वालकरच्या हत्येने देश हादरला आहे. लव्ह जिहाद प्रकरणातून ही घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत रोज नवे खुलासे समोर येत आहेत. यातील मुख्य आरोपी आफताब पुनावाला याला अटक करण्यात आली आहे.
या विकृत आरोपीने श्रद्धाचे 35 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 25 वर्षीय श्रद्धाचा 28 वर्षे आफताबने अतिशय शांत डोक्याने तिचा खून केला. या भयंकर प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब सध्या तुरुंगात आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की, मी श्रद्धाची हत्या करायला पाहिजे नव्हती.
याच एकमेव गोष्टीचा मला पश्चाताप होतोय. तिच्या शरीराचे तुकडे करून जंगलात फेकल्याचा मला अजिबात पश्चाताप होत नसल्याचा खुलासा आफताबने पोलिसांसमोर केला आहे.
श्रद्धाने त्याला एका मुलीबरोबर फोनवर बोलताना पाहिले. त्याच गोष्टींवरून त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि त्यातूनच हा प्रकार घडला. आफताबने सुमारे 20 तरुणींसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.