किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांमध्ये १० ते १५ रुपयांच्या आत वडापावची विक्री केली जाते. परंतु आता वडापावच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
पावाच्या दरात ५० पैशांची वाढ झाली आहे. २०२२ या वर्षातली ही तिसरी दरवाढ आहे. पावासोबत ब्रेडच्याही किंमती वाढल्यानं वडापावच्या किंमती वाढणार आहे.
वडापावसोबत समोसा, कचोरी आणि भजींचीही किंमत वाढण्याची शक्यता आहे. तीन ते चार रुपयांनी वडापावच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं १० ते १५ रुपयांना मिळणाऱ्या वडापावची किंमत २० रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ऐन हिवाळ्यात लोकांना या महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.