प्रसिद्ध अशा मराठी चित्रपट ‘टकाटक’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमवला. या चित्रपटात प्रथमेश परब, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. याच चित्रपटातील एका अभिनेत्रीबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
अभिनेत्री कोमल बोडखे हिने एक व्हिडीओ शेअर करत त्याची माहिती दिली आहे. कोमल इन्स्टाग्रामवर कायम सक्रीय असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने सायबर क्राईमची शिकार झाल्याचे सांगितले आहे. तिला काही नंबरवरुन तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली जात आहे. याबद्दल कोमलने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत कोमलने म्हंटल आहे की, गेल्या काही दिवसांपासून मला एका नंबरवरून फोन येत होते.
पण अनोळखी नंबर असल्याने मी तो फोन उचलला नाही. त्यानंतर मग त्यांनी माझ्या भावाला फोन केला. मला माझ्या भावाने मला फोन करून विचारलं की तू कोणत्या अँपवरून पैसे घेतले आहेस का? मी त्याला नाही असं म्हटलं. त्यावर तो म्हणाला की ते लोक तू घेतलेल्या पैशाची मागणी करत आहेत. तसेच ते व्याजही मागत आहे.