भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला- पुरुष खेळाडूंच्या मानधनाबाबतीत मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने करारबद्ध केलेल्या भारतीय महिला क्रिकेटूंना पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे समान मानधन देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विविध क्रिकेट सामन्यासाठी पुरुष क्रिकेटर्सप्रमाणे आता महिला क्रिकेटपटूंनाही समान वेतन असेल.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी पुरुष क्रिकेटर्सला 15 लाख रुपये दिले जातात. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यासाठी 6 लाख रुपये दिले जातात. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका सामन्यासाठी पुरुष क्रिकेटर्स 3 लाख रुपये मानधन दिले जातात, त्याचप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनाही तितकेच मानधन मिळणार आहे.