टी 20 अंध क्रिकेट वर्ल्डकप भारतीय संघाने जिंकला. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव करत विजय मिळवला. भारताच्या दृष्टिहीनांच्या संघाने तिसऱ्यांदा हा वर्ल्ड कप जिंकला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर २७८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, बांगलादेशला प्रत्युत्तरात ३ बाद १५७ धावा करता आल्या.
भारताने १२० धावांनी हा सामना जिंकला. भारताचा सलामीवीर वी राव १० धावा करून माघारी परतला, पण सुनील रमेशने ६३ चेंडूंत नाबाद १३६ धावा केल्या. कर्णधार ए के रेड्डीनेही ५० चेंडूंत १०० धावांची खेळी केली आणि संघाला २७८ धावांपर्यंत नेले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिली विकेट लवकरच गमावली.
डी व्यंकटेश्वर राव १० धावा केल्यानंतर १२ चेंडूत चौकार मारून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ललित मीणालाही खाते उघडता आले नाही. ललित मीणा बोल्ड झाला. सलमानने चार चेंडूंत दोन्ही विकेट घेतल्या. मात्र यानंतर बांगलादेशी फलंदाजांना संधी मिळाली नाही.