जेल म्हणजे नरकच, कोरा चहा पिऊन दिवस काढले

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
जेल म्हणजे जणू एक नरक असतं. तिथं गेल्यानंतर खाण्याचं, पिण्याचं, प्रकाशाचं, मोकळेपणाचं महत्व कळतं. कोऱ्या चहावर दिवस काढावे लागतात… अशा आठवणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शेअर केल्या. जेल म्हणजे एक प्रकारचं नरक असतं. परंतु मला कोर्टाच्या आदेशाने घरचं जेवण मिळायचं.
त्यामुळे मी नरकातल्याही स्वर्गात होतो. जेलमध्ये चहासाठी वाट पहावी लागायची. कोरा चहा यायचा. जेलच्या कोठडीत समोर पाहिल्यावर चारही बाजुने फक्त एक उंचच्या उंच भिंतच दिसते. तिथं तुम्हाला भिंतीशीच बोलावं लागतं. तुरुंगातला एक-एक तास हा १०० तासासारखा असतो, असं राऊत म्हणाले. स्वातंत्र्य काय असतं ते जेलमध्ये गेल्यावर कळतं. खाण्याचं, पिण्याचं, अंथरुण, पांघरून, जमीन, प्रकाश, एक एक रुपयाचं महत्व जेलमध्ये गेल्यावर तुम्हाला कळतं, असं राऊत म्हणाले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon