मेलबर्न मैदानावर पार पडलेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडला. हा सामना भारताने 70 धावांनी आपल्या नावावर केला. आता भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध गुरुवारी दोन हात करेल.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. यावेळी भारताने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 186 धावा चोपल्या होत्या.
सूर्यकुमार यादवच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर झिम्बाब्वेपुढे १८७ धावांचे आव्हान ठेवता आले होते. भारताचे १८७ धावांचे आव्हान पार करताना झिम्बाब्वेच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आल्या. झिम्बाब्वे संघाचा डाव 117 धावांवर संपुष्टात आला.