- टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. संघ सध्या ६ गुणांसह गट-२ मध्ये अव्वल स्थानावर आहे. तर रविवारी भारताला आपला शेवटचा ग्रुप सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात भारतीय संघ सहज विजय मिळवू शकतो. हा सामना जिंकल्यानंतर भारताचे ८ गुण होतील. या गटातील अन्य कोणताही संघ ८ गुणांपर्यंत पोहोचू शकणार नाही. अशा स्थितीत उपांत्य फेरीत भारताची टक्कर गट-१ मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होणार आहे.
- ग्रुप-१ बद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडने ७ गुणांसह उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे. ऑस्ट्रेलियाचेही ७ गुण आहेत, मात्र त्यांचा नेट रनरेट किवी संघापेक्षा कमी आहे.
- त्यामुळे कांगारूंचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांनी गट फेरीतील सर्व ५ सामने खेळले आहेत. तसेच या गटातील इंग्लंडचे सध्या ४ सामन्यांत ५ गुण आहेत. त्यांना उद्या (५ नोव्हेंबर) शेवटच्या ग्रुप सामन्यात श्रीलंकेचा सामना करायचा आहे. सेमी फायनल गाठण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकावाच लागणार आहे. इंग्लंडने हा सामना जिंकला तर त्यांचेही ७ गुण होतील.
- मात्र त्यांचा नेट रनेरट ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला आहे. त्यामुळे ते सहज सेमी फायनमध्ये एन्ट्री करतील. अशा स्थितीत गतविजेता ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपमधून बाहेर पडावे लागेल.
- जर श्रीलंका जिंकला तर इंग्लंड स्पर्धेतून बाहेर होईल. इंग्लंडचा नेट रनरेट न्युझीलंडपेक्षा कमी आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतरही दुसऱ्या स्थानावर येईल. म्हणजेच, सेमी फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड या दोघांपैकी एकाशी होणार आहे.